देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढविणार

काँग्रेसच्या मेळाव्यात आ. डॉ. सुधीर तांबे यांचे प्रतिपादन
देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढविणार

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

ज्या-ज्या वेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता राहिली, त्या त्यावेळेस शहराचा विकास झाला. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढविणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे प्रतिपादन आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले.

देवळाली प्रवरा येथे सभासद नोंदणी व काँग्रेस मेळावा पार पडला. कार्यक्रमास आ.सुधीर तांबे व आ.लहू कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण होते. यावेळी ज्ञानदेव वाफारे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे, संजय पोटे, अंकुश कानडे, संभाजी कदम, उत्तमराव कडू, नानासाहेब कदम, वैभव गिरमे, अन्सार इनामदार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले, भाजपाने कर्जमाफी दिली. मात्र ती घेण्यासाठी शेतकर्‍यांना किती त्रास झाला? महाविकास आघाडीने 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली. एकही शेतकर्‍याला कर्जमाफी घेताना त्रास झाला नाही. देवळाली प्रवरात सन 2001 मध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासगंगा उभी राहिली. सध्या देवळाली शहरात सध्या सत्ताधार्‍यांनकडून असमाधानकारक काम सुरू आहे. मात्र, येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला संधी भेटून पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आ.तांबे यांनी केले.

आ.लहू कानडे म्हणाले, प्रत्येक गावात काँग्रेसची शाखा स्थापन केली आहे. भाजपची वृत्ती शेतकर्‍यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या जमिनी कारखानदारांच्या घशात घालायच्या आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांच्या विरोधात काळे कायदे करण्यात आले आहेत.

माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले, देवळाली प्रवरात सन 2001 मध्ये दादागिरी मोडीत काढीत काँग्रेसची सत्ता आणली होती. 2011 मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आणली. या निवडणुकीत नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. भाजपाला जनता कंटाळली आहे. नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात असताना मोठे काम उभे केले आहे. प्रश्न सुटत नसतील तर अधिकारी व लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही असे दोन आमदारांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी व काँग्रेस पदाधिकार्‍यांना सडेतोड इशारा चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी चांगदेव चव्हाण, कुमार भिंगारे, जयेश माळी, गंगाधर गायकवाड, गीताराम बर्डे इंदुमती खांदे, रंजना चव्हाण, ज्योती गिरमे, सविता चव्हाण, भाग्यश्री कदम, शोभा कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com