देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा

देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा

देवळाली प्रवरा |वार्ताहार|Deolali Pravara

येथील खंडोबा मंदिराजवळ एका घरात अवैधरित्या प्लॅस्टिक गोण्यामध्ये विना परवाना शासकीय तांदूळ खरेदी-विक्री करणार्‍या एकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकाने हा छापा टाकला असून या ठिकाणी पथकाला 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा तांदूळ व 5 हजार 525 रुपये किंमतीचा शासकीय बारदाना मिळून आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा
संगमनेरात दोन गटात मध्यरात्री तुफान राडा

दरम्यान महिनाभरापुर्वी अशाच प्रकारचा शासकीय तांदूळ अवैधरित्या घेऊन जाणारा ट्रक इरिगेशन बंगला येथे पकडला होता. या कारवाईची शाई देखील सुकली नाही तेच पुन्हा तांदळाचा अवैध साठा सापडला आहे. या मागचा मुख्य सुत्रधार शोधून काढण्याचे खरे आव्हान या निमित्ताने पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा
एसपी ऑफिसवर सर्वपक्षीय धडकले

येथील आनंद लखीचंद देसरडा हा शहरातील खंडोबा मंदीराजवळ राजळे वस्ती येथे अवैधरित्या प्लॅस्टिकच्या गोण्यामधील तांदूळ विनापरवाना खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला. तसेच त्याच्याकडे शासकीय खाकी बारदाणे (गोण्या) ही महसूल पथकाला मिळून आले. यावरुन राहुरीचे तहसीलदार एफ. आर.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील औटी, महेश देशमुख, तलाठी दीपक साळवे यांच्या पथकाने कारवाई केली.

देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा
संगमनेरच्या मामा-भाच्यासह चौघांवर गुन्हा; काय आहे प्रकरण वाचा..

या छाप्यात 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 166 तांदूळ गोण्या तसेच 5 हजार 525 रुपयाचा 325 शासकीय गोण्या असा एकूण 1 लाख 25 हजार 525 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत राहुरीचे पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आनंद लखीचंद देसरडा याच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा येथे तहसीलदारांच्या पथकाने पकडला शासकीय तांदूळ गोण्यांचा साठा
जामखेड दुहेरी हत्याकांड; एकास जन्मठेप

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com