देवळाली प्रवरात गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त

पोलीस उपअधीक्षकांची कारवाई; 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त
देवळाली प्रवरात गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) तालुक्यातील देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील अवैध गावठी (Illegal liquor hatbhatti) हातभट्टी दारूअड्डयावर शुक्रवार दि.9 जुलै रोजी पोलिसांनी संयुक्त छापा (Police raids) टाकत दारूअड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत एकूण 1 लाख 82 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke), राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) आणि राहुरी पोलीस (Rahuri Police) यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारूअड्डे (Illegal liquor hatbhatti) व हातभट्टी दारू तयार करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा (raid) टाकून परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 6 हजार 240 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू 118 लिटर व तसेच 200 किलो नवसागर असा एकूण 1,82,950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानुसार आशाबाई बाळासाहेब गायकवाड, मयूर अनिल गायकवाड, सतीश वसंत गायकवाड, बापू भास्कर गायकवाड, मंगल बापू गायकवाड आणि एक अज्ञाताविरोधात भादंवि कलम 328, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (फ) नुसार

नितीन शिरसाठ नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, श्रीरामपूर यांच्या फिर्यादीनुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल (Filed a case at Rahuri police station) करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com