देवळाली प्रवरात सात-बारा उतार्‍याचे शेतकर्‍यांना मोफत वितरण

देवळाली प्रवरात सात-बारा उतार्‍याचे शेतकर्‍यांना मोफत वितरण

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने महात्मा गांधी जयंती दिवशी देवळाली प्रवरा येथे मोफत संगणकीकृत 7/12 वितरण सोहळा संपन्न झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींच्या प्रयत्नातून व निर्णयानुसार काल देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृह येथे महात्मा गांधी व पंडित लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोफत संगणकीकृत 7/12 वितरण करण्यात आले.

लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दूरदृष्टीपूर्वक व त्यांच्या संकल्पनेतून शेतकर्‍यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संगणकीय सातबारा उतार्‍यामुळे शेतकर्‍यांचा वेळ आणि पैसा वाचणार असून त्यांची हेळसांड थांबणार आहे. शेतकर्‍यांनी महाविकास आघाडीने राबविलेल्या अनेक हितकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे म्हणाले, शेतकर्‍यांना संगणकीकृत उतारा मोफत मिळणार असल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना आता संगणकीकृत उतार्‍यामुळे शेतकर्‍यांना पाठबळ मिळणार आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास सरकार शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेत आहे. शेतकर्‍यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कराळे यांनी केले.

यावेळी तलाठी दीपक साळवे यांनी खाते उतार्‍यांचं वाचन करून वर्षभरात विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती दिली. सुधारित 7/12 च्या नमुन्यातील बदलांची माहिती, दि.15 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत माहिती आणि महसूल विभागाच्या इतर ऑनलाइन सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीत सुधारित 7/12 उपलब्ध करून देणेबाबत विशेष मोहिमेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेवक सचिन ढुस, बाळासाहेब खुरुद, संगीता चव्हाण, सुजाता कदम, संजय बर्डे, आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, अमोल कदम, भिमराज मुसमाडे, रवींद्र मुसमाडे, भारत शेटे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com