देवळाली प्रवरा शहराला ‘बेस्ट सिटी’ व थ्री स्टारचा सन्मान

नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी स्वीकारला पुरस्कार
देवळाली प्रवरा शहराला ‘बेस्ट सिटी’ व थ्री स्टारचा सन्मान

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

देशभर राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात देवळाली प्रवरा शहरास बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार, राज्यात दुसरी रँक, देशाच्या पश्चिम विभागात चौथी रँक व कचरामुक्त शहरामध्ये थ्रीस्टार सिटी मानांकन असे पुरस्कार मिळाले आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिल्ली येथून भ्रमणध्वनीद्वारे दिली.

पुरस्कार वितरण सोहळा 20 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंग पुरी, राज्यमंत्री कौशल कुमार, छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग, अंदमान निकोबारचे उपराज्यपाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये वितरित करण्यात आला.

देवळाली प्रवरा शहरास स्वच्छ अमृत महोत्सव (सर्वेक्षण )2021 मध्ये देशातील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या सर्व शहरामध्ये बेस्ट सेल्फ सस्टनेबल सिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व राज्यात स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये दुसरा रँक मिळाला. देशाच्या पश्चिम विभागात चौथा रँक मिळाला आहे व कचरा मुक्त शहरामध्ये थ्रीस्टार सिटी मानांकनाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा व भारत मिशनच्या सहसचिव रूपा मिश्रा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी शहराचे प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी अजित निकत, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे, आरोग्य सभापती सचिन ढुस, कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके व संभाजी वाळके उपस्थित होते.

शहरास हे सर्व मिळालेले पुरस्कार नागरिक, सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने आणि सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामांमुळे मिळाले आहेत. हे पुरस्कार मी माझ्या सर्व स्वच्छता कर्मचारी व शहरवासियांना बहाल करतो.

- सत्यजित कदम, नगराध्यक्ष.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com