देवळाली प्रवरा येथील माय-लेकावर गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ व मारहाणप्रकरणी
देवळाली प्रवरा येथील माय-लेकावर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

तुम्ही माझ्या दारात का आले? असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करण्यात आली. ही घटना दि. 25 एप्रिल रोजी रात्री देवळाली प्रवरा परिसरात घडली. या घटने बाबत दोघांवर अनुसूचित जाती जमाती कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत संभाजी दोंदे, वय 28 वर्षे, राहणार देवळाली प्रवरा, राहुरी. याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान चंद्रकांत दोंदे व त्याचा भाऊ विकास दोंदे तसेच दोन कामगार प्रसाद सतिश मुसमाडे व सुनिल मिसाळ हे सर्वजण आरोपीला दिलेला फ्रिज आणण्यासाठी सतिश पठारे याच्या घरी गेले होते.

आरोपींनी चंद्रकांत दोंदे याला जातीवाचक शिवीगाळ करुन तुम्ही माझ्या दारात का आले? असे म्हणून त्याने लाकडी दांड्याने विकास दोंदे यास मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचवेळी चंद्रकांत दोंदे हा सोडवा सोडव करण्यासाठी गेला असता त्याला देखील लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. त्यावेळी सतिश पठारे याचे आईने चंद्रकांत दोंदे व विकास दोंदे यांना शिवीगाळ करुन मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीची गाडी फोडुन नुकसान केले.

चंद्रकांत संभाजी दोंदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपी सतिश पठारे व त्याची आई दोघे राहणार देवळाली प्रवरा, ता. राहुरी या दोघांवर जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.