वाघाचा आखाडा स्मशानभूमीतील शवदाहिनीची तोडफोड; नागरिकांमधून संताप

वाघाचा आखाडा स्मशानभूमीतील शवदाहिनीची तोडफोड; नागरिकांमधून संताप

आरडगांव | वार्ताहर

राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधामातील शवदाहिनीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना ताजी असताना वाघाचा आखाडा येथील अमरधामात देखील तशाचा प्रकारे अज्ञाताने शववाहिनीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अशाप्रकारे घटना का घडत आहेत याची चर्चा नागरिक करत आहेत.

वाघाचा आखाडा स्मशानभूमीतील शवदाहिनीची तोडफोड; नागरिकांमधून संताप
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

वाघाचा आखाडा( ता.राहुरी) येथील अमरधामातील बुधवारी पटाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तिंनी शव वाहीनीची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अमरधामातील शवदाहीनीचे अज्ञात व्यक्तिंनी तोडफोड करून लोखंड प्लेट चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शवदाहीनी चोरी का की जाणून-बुजून तोडफोड केली आहे. खरे कारण कळु शकले नाही.

वाघाचा आखाडा स्मशानभूमीतील शवदाहिनीची तोडफोड; नागरिकांमधून संताप
बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. रणबीर-आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख ठरली?

माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून ज्या ठिकाणी माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणच्या शवदाहिनीचे नुकसान करणाऱ्या विकृत प्रवृत्तीला चांगलेच धडे शिकवले पाहिजे असे संतप्त ग्रामस्थांन मधून बोलले जात आहे. या घटनेची महिती राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन या घटनेची चौकशी मागणी आदिनाथ तनपुरे, राजेद्र सप्रे, किशोर दोंड, शरद धसाळ, गोरक्षनाथ कटारे, विलास धसाळ, गणेश वाघ, बाळासाहेब सप्रे, उत्तम वाघ, प्रदिप भगत, बाबा कटारे, बबलु धसाळ ,धनंजय सप्रे, दत्तात्रय तनपुरे, सुभाष वाघ,मोहन तनपुरे, संतोष सप्रे, अनिल कटारे,प्रशांत सप्रे, गजानन सप्रे नवनाथ वाघ, पिनू कटारे, शरद तनपुरे, बद्रिनाथ तनपुरे, सुनिल सप्रे, संदिप सांगळे, बाळु धसाळ,अनिल वाघ, भालचंद्र सप्रे, प्रशांत कटारे, पप्पु वरखडे, नंदु वाघ आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.