राहुरीच्या पूर्वभागात एसटी सेवा सुरु करण्याची मागणी

राहुरीच्या पूर्वभागात एसटी सेवा सुरु करण्याची मागणी
बस सेवा

वळण (वार्ताहर)

गेल्या दीड वर्षापासून राहुरीच्या पूर्वभागातील ग्रामीण भागात बंद पडलेली एसटी सेवा सुरू करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय आढाव, ऋषिकेश आढाव, प्रकाश खुळे यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले, शासनाने पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू केल्या. मात्र विद्यार्थ्यांसाठी कॉलेजवर जाण्यासाठी एसटी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. सध्या खासगी वाहनांमध्ये एका विद्यार्थ्याला महिन्याला २४०० रुपये द्यावे लागतात. यापूर्वी एका विद्यार्थ्याला एसटीने चारशे रुपये पास काढण्यासाठी लागत होते.

विद्यार्थी ऋषिकेश कुलट म्हणाला, एसटी नसल्यामुळे खासगी वाहनावाले वेळेवर येत नाही. त्यामुळे काही तास वाया जातात. पैसे देऊनही वेळेवर जाता येत नाही.

पालक वर्गातून ज्ञानेश्वर आहिरे म्हणाले, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कॉलेजवर जाण्यासाठी एसटीची राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातून सोय नाही. त्याकरिता एसटी महामंडळाने ताबडतोब एसटी सेवा सुरू करावी.

रोहिदास आढाव म्हणाले, शासनाने मुलींना पहिली ते बारावीपर्यंत एसटीची मोफत सोय केली आहे. मात्र सध्या एसटीच नाही, मुलींना देखील खासगी वाहनांमध्ये जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तसेच मुलींना जाताना- येताना त्रास सहन करावा लागतो.

Related Stories

No stories found.