साईबाबांचे प्रसादालय अटीशर्तीचे पालन करून सुरु करण्याची मागणी

साईबाबांचे प्रसादालय अटीशर्तीचे पालन करून सुरु करण्याची मागणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेघा किचन असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांचे प्रसादालय राज्य शासनाच्या नियम आणि अटीशर्तीचे पालन करत सुरु करावेत अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.

साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेली दर्शन व्यवस्था अतिशय उत्कृष्ट असून श्री साईबाबांचे दर्शन मनोभावे घेता आल्याचा आनंद यावेळी भाविकांनी व्यक्त करून दाखवला परंतु साईबाबांचा प्रस्ताव इन शिर्डीतून माघारी जाण्याची वेळ आली असल्याची खंत भाविकांनी बोलून दाखवली असून संस्थानने भाविकांच्या भावनेचा विचार करून प्रसादालय सुरू करावे अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध साईमंदीर संस्थानच्या इतिहासात सहा महिने बंद तर सहा महिने सुरू असे चित्र बघायला मिळाले आहे.मागील वर्षी २२ मार्च २०२० रोजी कोव्हिडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाँकडाऊन घोषित करण्यात आला होता.परंतु साईमंदीराचे दरवाजे १७ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आले होते.तेव्हापासून करोनाच्या काळात दोन वेळा मंदिर बंद करण्याची वेळ आली. परंतु आता देशात कोव्हिडचे लसिकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर दि. ७ आँक्टोंबर रोजी दर्शनासाठी खुले केली आहे.

साईसंस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी उत्तम प्रकारे नियोजन केले आहे. दिवसभरात आँनलाईन पद्धतीने पंधरा हजार भाविकांसाठी दर्शन व्यवस्था केली आहे. मंदिर खुले केल्यानंतर शिर्डी नगरी भाविकांनी फुलून गेली आहे. साईसमाधीचे दर्शन अतिशय मनोभावे झाले परंतु लाडूप्रसाद तसेच भोजनप्रसाद न मिळाल्याने भाविकांची निराशा झाली असून प्रशासनाने भाविकांच्या दानावर चालत असलेल्या भक्तांच्या भावनेचा विचार करून प्रसादालय सुरू करावे अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.प्रशासनाकडून आदेश प्राप्त होताच प्रसादालयात भावीकांसाठी कोव्हिडच्या नियमानुसार पुर्णपणे तयारी केली आहे.

याठिकाणी एकावेळी सहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतात अशी व्यवस्था आहे, जर संस्थानने दिवसभरात पंधरा हजार भाविकांसाठी दर्शन व्यवस्था केली आहे त्यामुळे पंधरा हजार भाविकांपैकी किमान दहा हजार भाविकांना दहा तासात लाभ देता येईल का याचाही अभ्यास संस्थानने करावा असेही भाविकांचे म्हणणे आहे.मात्र सध्या जिल्हाधिकारी यांनी प्रसादालय तुर्तास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट साईभक्तांना पहावी लागणार आहे. तसेच लाडूप्रसाद देखील सुरू करावा असेही भाविकांनी म्हटले आहे.

संस्थानचा लाडूप्रसाद शुद्ध गावरान तुपात बनविण्यात येत असल्याने त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते, परंतु सध्या बाहेर खाजगी स्टाँलवर लाडूची विक्री होत असून त्यास भाविकांना नाईलाजाने खरेदी करावा लागत असल्याचे सांगितले. दरम्यान संस्थानच्या अन्नदान फंडात अंदाजे २५ कोटी रुपये निधी पडून आहे.दोन वर्षापासून भाविकांसाठी प्रसादालय बंदच आहे.किमान प्रसादालय सोशल डिस्टंसिंग, सँनिटायझर मास्क याचा वापर करून सुरू केल्यास गोरगरिबांना तसेच साईभक्तांना लाभ मिळेल अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.