स्वस्त धान्य चोरी प्रकरणी अधिकार्‍यांसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

स्वस्त धान्य चोरी प्रकरणी अधिकार्‍यांसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
संग्रहित

अकोले (प्रतिनिधी) - अकोले तालुक्यात झालेल्या मोफत स्वस्त धान्य चोरी व घोटाळ्याची पोलिस यंत्रणेच्या मार्फत चौकशी करण्यात यावी व यातील दोषी अधिकारी, ठेकेदार, प्रत्यक्ष वाहतूक करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्याकडे सुरेश भिवाजी भांगरे (रा. कौठवाडी), चंद्रकांत सिताराम गोंदके (रा.करंडी), पांडुरंग आनंदा खाडे (रा. भंडारदरा) यांनी केली आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल (अ) घटकातील सामान्य व गरीब नागरीक आहोत. केंद्र सरकार मार्फत मिळणार्‍या मोफत व राज्य सरकारच्या स्वस्त धान्याच्या पुरवठ्यावर आमच्या सारख्या व इतर लाखो आदिवासी व गरीब जनतेचे कुटुंब चालते.

अकोले तालुक्यात या मोफत व स्वस्त धान्य वाटपात मोठा घोटाळा असुन काही शासकीय अधिकारी, ठेकेदार, एजंट व पदाधिकारी ही मंडळी गरिबांच्या या हक्काच्या धान्यावर सतत डल्ला मारतात, चोर्‍या करतात. दि.12/05/2021 रोजी राजूर पोलिस स्टेशनने शासनाच्या मोफत व स्वस्त धान्याचे अधिकार्‍यांना हाताशी धरुन चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणेसाठी नेत असताना पोलिसांनी या चार ट्रक पकडल्या व या ट्रकचे ड्रायव्हर, शासनाचे गोदामपाल गंभीरे व या चोरी प्रकरणातील एजंट व अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपाध्यक्ष संतोष काळु परते यांचे विरुध्द अत्यावश्यक वस्तु कायद्याचे खाली गु.र.नं.69/21 हा दाखल केला.

या गुन्ह्याचे संदर्भात माजी आमदार वैभवराव पिचड, आम्ही अर्जदार व इतर अनेक लोकांनी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांची भेट घेऊन या गुन्ह्यातील खरे सुत्रधार व मुख्य आरोपी यांचा तपास करुन आरोपी म्हणून सामील करावे व या सर्व आरोपींविरुध्द चोरी, जबरी चोरी अगर संगनमताने दरोड्याचा गुन्हा या कलमाखाली त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी वारंवार तोंडी व लेखी मागणी राजूर पोलिस स्टेशन व शासनाकडे केली आहे. सरकार, शासकीय अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदार यांच्या दबावामुळे राजूर पोलिस स्टेशनने सदर गुन्ह्याचा योग्य तपास केला नाही तसेच यातील मुख्य व सुत्रधार आरोपींना सदर गुन्ह्यातून हेतूपूर्वक वगळण्यात आले.

राजूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्हा रजिस्टर नं. 69/2021 मध्ये खालील अधिकारी व्यक्तींचा थेट संबंध आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना आपणाकडून योग्य ते आदेश व्हावेत व या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com