मनपा कर्मचार्‍यांना रेमडेसिवीर राखीव ठेवा

कामगार संघटनेची आयुक्तांकडे मागणी
मनपा कर्मचार्‍यांना रेमडेसिवीर राखीव ठेवा

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना परिस्थितीत महानगरपालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. शहरात रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगरसाठी आणलेल्या 300 रेमडेसिवीरमधून 50 इंजेक्शस महापालिका कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे व डॉ. मेहबूब सय्यद यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महानगरपालिकेचे दोन कर्मचारी करोनामुळे गंभीर असताना युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनीी रेमडेसिवीर मिळविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना फोन केला. परंतु, महापालिका व जिल्हा प्रशासनच हतबल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचार्‍यांना इंजेक्शन मिळू शकत नाही, ही बाब निषेधार्ह आहे. खासदार डॉ. विखे यांनी आणलेल्या इंजेक्शन्स पैकी 50 इंजेक्शन कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com