रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन उपलब्ध करावे

रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन उपलब्ध करावे

सेवाभावी संस्थाच्यावतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरकरांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन त्वरित उपलब्ध होणेबाबत शहरातील विविध सेवा भावी संस्थांच्यावतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिजामाता तरुण मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, जय माता मित्रमंडळाचे रवींद्र गुलाटी, उद्योजक व नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक राजेश अलघ, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे, सुशिल गांधी यांच्यासह शहरातील जय मातादी मित्र मंडळ, जिजामाता तरुण मित्र मंडळ,, कालिका माता मित्र मंडळ, हिंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

श्रीरामपूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णांसाठी शहरातील कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसून रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजनची कमतरता आहे. रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक दारोदार फिरूनदेखील त्यांना या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होत नाहीत. हॉस्पिटलमध्ये रुग्ण अ‍ॅडमिट होण्यासाठी गेले असता हॉस्पिटलमधून आधी इंजेक्शन घेऊन या नंतर अ‍ॅडमिट करू असे सांगितले जाते, रुग्णांचे नातेवाईक सारीकडे फिरून देखील त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत.

शहरातील कोवीड-19 या आजाराने रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावत असून श्रीरामपुरात भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांचा संयम संपला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बाकीच्या तालुक्यांमध्ये ऑक्सिजन व रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत असून त्यादृष्टीने श्रीरामपूर तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. रुग्णांना औषधे व ऑक्सिजन मिळत नसल्या कारणामुळे रूग्णांमध्ये व नातेवाईकांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मक्लेश व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे श्रीरामपूरकरांसाठी लवकरात लवकर रेमडेसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध व सुरळीत पुरवठा व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेनिवेदनावर माननीय उपविभागीय अधिकारी यांनी शासनस्तरावर आम्ही प्रयत्न करत असून लवकरात लवकर रेमेस सीडीवर तसेच ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तुमच्या अंतर भावना आम्ही समजून घेतल्या आहेत वरिष्ठांना आपल्या भावना कळून आम्ही श्रीरामपूर तालुक्यातील जनतेसाठी या आपातकालीन परिस्थितीत रुग्णांना लागणार्‍या सर्व व्यवस्था पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने शहरातील काही केमिस्टचे नवीन कंपनीचे रेमेडीसिवर इंजेक्शनचे लागणारे कोडही आम्ही ओपन केलेले आहेत त्या वेगवेगळ्या कोडमध्ये पाच ते दहा लाखाची रक्कमही भरलेली आहे कंपनींना श्रीरामपूर शहराची गंभीर परिस्थितीबाबत कल्पना देऊन श्रीरामपूरकरांसाठीचा कोटा कंपनीकडून इंजेक्शन्स मागून घ्यावेत व प्रांत कार्यालयामार्फत रुग्णांना इंजेक्शन्स देण्यात यावेत अशी मागणी केली.

- रवींद्र गुलाटी, माजी उपनगराध्यक्ष

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com