माहेरुन 50 हजार रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ

माहेरुन 50 हजार रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तुझ्या नातेवाईकांकडून लग्नात झालेला पन्नास हजार रुपयांचा खर्च घेऊन ये, तुला मुलबाळ होत नाही, स्वयंपाक येत नाही

या कारणावरून घरातील उलटनी गॅसवर तापवून तोंडावर, ओठावर, पाठीवर चटके देऊन क्रूर वागणूक दिल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे माहेर असलेली मात्र भुसावळ जिल्हा-जळगाव येथे सासर असलेल्या सविता हेमंत ठाकरे (वय 22) रा. पानकुरा, ता. भुसावळ हिने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नवरा हेमंत रमेश ठाकरे व सासू लताबाई रमेश ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील फिर्यादी महिला सविता ठाकरे हिचे लग्न पाच वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पानकुरा येथील वर हेमंत ठाकरे याचे बरोबर झाले होते. सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या परिवाराने आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला आहे.

त्यानी काही वर्षापासून त्रास द्यायला सुरुवात केली. त्यात तुझ्या नातेवाईकांकडून लग्नाचा खर्च झालेले पन्नास हजार रुपये घेऊन ये, तुला मुलबाळ होत नाही, स्वयंपाक येत नाही, घरात काम जमत नाही असे म्हणून नेहमी आडून पाडून बोलून लाथाबुक्क्यांनी काठीने मारहाण करून दुखापत केली तसेच दि.9 एप्रिल रोजी तर त्यांनी कहर केला असून भाकरी भाजण्याची उलटनी गॅस वर तापवुन आपल्या तोंडावर, ओठावर, पोटावर चटके दिले व मला क्रूर वागणूक दिली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

फिर्यादी माहिला सविता हेमंत ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रं. 109/2021 अन्वये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाणे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे पुढील तपास पोलिस करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com