संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना काळात लग्न झाल्याने वाचलेले दोन लाख रुपये तुझ्या आईकडून नवीन व्यवसाय करण्यासाठी घेऊन ये,

असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून त्यावरून वैजापूर येथील सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत साक्षी ज्ञानेश्वर बनसोड (वय 19) रा. सुतार गल्ली वैजापूर जि. औरंगाबाद हल्ली रा. इंदिरानगर संगमनेर हिने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी महिनाभरापासून आई स्वाती अनिल मुंडलिक रा. इंदिरानगर, संगमनेर येथे राहते. माझे वडील 12 वर्षांपासून आमचेपासून वेगळे राहतात. माझे लग्न 14 जून 2020 रोजी वैजापूर येथील ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड यांचेसोबत संत नरहरी महाराज मंदिर श्रीरामपूर येथे झाले होते.

सासरी नांदत असताना काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी तुझ्या आईने करोना काळात चांगले लग्न करून दिले नाही. त्यामुळे तिचे पैसे वाचले आहेत. त्यामुळे तिच्याकडून व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत.

त्यासाठी मारहाण करून उपाशीपोटी ठेवून छळ करून घराबाहेर काढून दिले. माझा नवरा ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड याने दोन लाख रुपये न दिल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली.

या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी नवरा ज्ञानेश्वर श्रीराम बनसोड, सासू रेखा श्रीराम बनसोड, सासरा श्रीराम कचरुशेठ बनसोड, दीर रोहीत श्रीराम बनसोड (सर्व रा. वैजापूर) यांचेवर हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.