दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला

दसऱ्याच्या निमित्ताने का होईना झेंडूला दर मिळाला

शेवगाव | शहर प्रतिनिधी

दसरा विजयादशमी निमित्त शेवगावच्या बाजार पेठेत शेतकरी व व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले विक्रीसाठी आणली. झेंडूच्या एका किलोसाठी सुरुवातीला शंभर रुपये मात्र आवक मोठ्या प्रमाणात असल्याने शेवटी ४० ते ५० रुपये किलो दराने या झेंडूच्या फुलाची विक्री झाली. तुलनेत झेंडू व्यतिरिक्त इतर फुलांना मागणी नसल्याने झेंडूच भाव खावून गेल्याचे शेतकरी व विक्रेत्यांनी सांगितले.

मागील आठवड्यापर्यंत सतत सुरु असलेल्या पावसामुळे तसेच इतर पिकाबरोबर नगदी पिक म्हणून शेतक-यांचा फुल शेतीकडे कल वाढला आहे. मात्र पाउस व खराब हवामानामुळे फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे उत्पादक उत्पादकांनी सांगितले. करोनाच्या महामारीमुळे गेली अनेक दिवस भाजी बाजार बंद राहिला. आता काही प्रमाणात शासनाकडून बाजार उघडण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आज शुक्रवारी दस-याच्या दिवशी येथील फुल उत्पादक शेतक-याबरोबर नगर, करमाळा परिसरातून फुल विक्रेत्यांनी विक्रीसाठी फुले आणल्याने येथील बाजार पेठेत फुलांची मोठी आवक झाल्याचे दिसून आले. भल्या सकाळी फुलांना असलेला प्रती किलो १०० रुपयांचा दर दुपार नंतर ४० ते ५० रुपयापर्यंत खाली आला. त्यामुळे अनेक विक्रेत्यांना व शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागला. गत वर्षीच्या तुलनेत यंदा फुलाचे उत्पादन निम्म्यापर्यंत घटल्याने बाजारात फुलांना तेजी असली तरी वाढीव खर्चामुळे परिसरातील अनेक फुल उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com