रासायनिक खते महागल्याने शेणखत खाऊ लागले ‘भाव’

रासायनिक खते महागल्याने शेणखत खाऊ लागले ‘भाव’

वसंत आढाव

वळण - रासायनिक खतांच्या किंमती वाढू लागल्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी शेण खताकडे वळला आहे. अचानक शेतकर्‍यांकडून आता शेणखताची मागणी वाढल्याने सध्या हे शेणखत भाव खाऊ लागले आहे.

सध्या इको खताची गोणी पहिली 1175 रुपयाला होती. आता 1775 रुपयाला झाली आहे. खतांच्या किंमती वाढत असताना शेतकर्‍याच्या मालाला भाव नाही. त्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतामध्ये रासायनिक खताऐवजी शेणखत टाकायला सुरुवात केली आहे. ट्रॅक्टरचा भाव अठराशे ते दोन हजार रुपये आहे. रासायनिक खताची एक गोणी 50 किलोची 1900 रुपयाला झाली आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने आपापल्या शेतामध्ये शेणखत टाकण्यास सुरुवात केली आहे.

ट्रॅक्टर वाहतुकीचा एका खेपाचा भाव शेतामध्ये टाकण्यासाठी पाचशे रुपये आहे. तर भरण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये लागतात. शेतकरी प्रकाश खुळे म्हणाले. एकदा शेणखत टाकले तर किमान पाच वर्षे जमीन सुपीक रहाते. शेतकरी मुकिंदा काळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून गव्हाचे भाव अठराशे ते दोन हजार रुपये आहेत. रोहिदास आढाव म्हणाले, उसाचे चालू गळीत हंगामातील अठराशे ते बावीसशे पन्नास पहिले पंधरवाडा पेमेंट एवढे झाले आहे. किमान शेतकर्‍यांना कारखान्याने तीन हजार रुपये पहिले पेमेंट दिले पाहिजे.

ट्रॅक्टरचालक सुनील भाऊसाहेब आढाव म्हणाले, आमच्याकडे कायमचे लेबर आहेत व कुठल्याही शेतकर्‍यांची अडवणूक करत नाही. आम्ही शेणखत घेतो व ज्याला लागेल त्याला आम्ही पोहोच करतो. आतापर्यंत फळबागासाठी राहुरी तालुक्यातील बाहेरच्या तालुक्यात देखील शेणखत पोहोच केले आहे. संगमनेर, राहाता, पाथर्डी या भागात देखील आम्ही शेणखत पोहोच केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com