छेडछाड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

विधवा महिलेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
छेडछाड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी )

छेडछाड करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्या आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विधवा पिडीत महिलेने पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले.

एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना पाठिशी घालण्यासाठी फक्त त्यांच्यावर मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.

नागापूर गावठाण येथे घरा शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेस विकास गायकवाड व आकाश गायकवाड या बंधूंनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याबद्दल एमआयडीसी पोलिस स्टेशनला त्यांच्यावर नुकताच मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एमआयडीसी येथील सन फार्मा चौक येथे विकास गायकवाड याने छेड काढली. तो मागील काही दिवसापासून छेड काढत असल्याने त्यांच्या घरच्यांना सांगण्यासाठी घरी गेले होते. मात्र, तेथे असलेल्या विकास व आकाश गायकवाड यांनी शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत मारहाण केल्याचा आरोप संबंधीत महिलेने केला आहे.

Related Stories

No stories found.