गुन्हा दाखल करावा म्हणून प्रकाश चित्ते यांचे उपोषण

गुन्हा दाखल करावा म्हणून प्रकाश चित्ते यांचे उपोषण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

रेमडीसीवर इंजेक्शन या औषधाचा काळाबाजार करताना दोन जणांंना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पाच ते सहा तास उलटूनही फिर्याद दाखल करण्यात येत नसल्याचे पाहून भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुुरु केले.

रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून याबाबत विचारले असता गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करु असे पोलिासांनी सांगितले. सहा ते सात उलटूनही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी येत नसल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

शेवटी पोलिसांनी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु केले असल्याचे सांगितले. त्यानंतर चित्ते यांनी आपले उपोषण मागे घेतले. उपोषण स्थळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट देवून उपोषण मागे घेण्याबाबत सांगितले. त्यावेळी फिर्याद दाखल केली असल्याचे सांगितले आणि उपोषण स्थगित केले.

याप्रसंगी भाजपचे नगरसेवक किरण लुणीया, टॅक्सी असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील मुथ्या, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, संजय पांडे ,बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, अर्बन बॅकेचे माजी संचालक दीपक दुगड, सुदर्शन नगरीचे चेअरमन देविदास चव्हाण, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, श्रीराम तरुण मंडळाचे राजेंद्र सोनवणे, संजय रुपटक्के, गणेश जायगुडे, सोमनाथ कदम, संदीप बाळासाहेब मराळे वाघमारे, सॅन्डी पवार, सुहास पवार, गणेश भिसे, बिट्टूशेठ ककड, अर्जुन करपे, बबन जाधव, संजय यादव ,शेखर आहेर, राजू पडवळ, रवी चव्हाण, संदीप पवार, राहुल अस्वले, दर्शन चव्हाण, भारत शेळके, माउली जाधव, मच्छिंद्र बहिरे, दत्ता पवार, दुर्गेश गायकवाड रात्री उशिरापर्यंत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com