पुणतांबा (वार्ताहर) -

नवी दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलन संपूर्ण देशाचे आहे. कायदे रद्द झाल्याशिवाय शेतकरी दिल्लीतून परत जाणार

नसल्याचा निर्धार केला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यावर सडकून टीका करून पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधात बोलत आहे, असा आरोप केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल रथ यात्रेच्या सुरुवातप्रसंगी संयुक्त किसान मोर्चाचे कोअर कमिटी सदस्य संदीप गिट्टे यांनी केला आहे.

पोलखोल रथ यात्रेस किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव व कृषी कन्या निकीता जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. राष्ट्रीय किसान मजदूर महासंघ, राष्ट्रीय किसान महासंघ, भारतीय किसान युनियन, किसान क्रांती जनआंदोलन या देश पातळी वरील संघटनांच्या एकत्रीत येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी विरोधात आहे हे राज्यातील शेतकर्यांना पोलखोल रथ यात्रेच्या माध्यमातून राज्यभर शेतकर्यांचे प्रबोधन करणार आहे. शिवाय कायदे रद्द झाल्याशिवाय घरी जायचे नाही असे 40 जणांच्या कोअर कमिटीत चंदीगड येथे ठरले असून कोअर कमिटीतील राष्ट्रीय नेते राज्याच्या या पोल खोल यात्रेत सहभागी होणार आहे. शिवाय या पोलखोल यात्रेची सुरुवात पुणतांबा येथून करण्यात येत आहे. कारण याच गावात शेतकरी आंदोलनास देशातील पहिली सुरुवात झाली आहे. शिवाय आमची ओळख पुणतांब्याचे शेतकरी अशी तयार झाली. पोलखोल यात्रेची सांगता नांदेड येथे होणार असून दिल्ली येथे 26 जानेवारीच्या टॅ्रक्टर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संदीप गिट्टे यांनी केले आहे.

किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी पतंप्रधान मोदी हे स्वतःला नोकर समजतात तर ते आहेच आशा शब्दत टिका केली. तसेच शिवसेनेचे सुहास वहाडणे, शंकर दरेकर, कृषी कन्या निकीता जाधव, अरुण कान्हेरे, लक्ष्मण वणगे यांची भाषणे झाली. यावेळी माजी सरपंच सर्जेराव जाधव, शिवसेना तालुका उपप्रमुख भास्कर मोटकर, दत्ता सुराळकर, किसन बोरबणे, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी, प्रकाश बनकर, राजेंद्र लांडगे, नामदेव बोरबणे, अरुण बोरबणे, प्रभाकर बोरबणे, प्रणिल शिंदे, आप्पासाहेब इंगळे, विजय जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचलन गणेश बनकर तर आभार चंद्रकात वाटेकर केले.