देहुत पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील दोन्ही मंहतांना मिळाला मान

देहुत पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील दोन्ही मंहतांना मिळाला मान

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

देहु येथे झालेल्या जगतगुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमास नगर जिल्ह्यातील देवगड संस्थानचे मंहत भास्करगिरी महाराज व सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराज यांना मोठा मान सन्मान मिळाला.

उत्तर महाराष्ट्ाचे संयोजक म्हणून बबन मुठे यांच्यावर आध्यात्मिक आघाडी महाराष्ट् व देहू संस्थानने जबाबदारी टाकली होती. नगर जिल्ह्यातील या दोन्ही मंहतांचा सत्कार जगतगुरू संत तुकाराम महाराज संस्थान, भंडारा डोंगर संस्थान, आळंदी संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.

प्रारंभी व सांगतेनंतर महंत भास्करगिरी महाराज व रामगिरी महाराज यांच्या बरोबर महाराष्ट्रातील मोठे देवस्थान असलेल्या मंहतांनी गळाभेट घेउन आदराची भावना दाखवली तर सदगुरू जनार्दन स्वामीचे उत्तारधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना या दोनही मंहताच्या अंगावर पुष्प टाकल्याने अनेकाचे लक्ष्य या दोन्ही मंहताकडे होते.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, वेंदात देवदास, जयंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगूलकर, आसाराम महाराज बढे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com