डिग्रसला पतीपत्नीला मारहाण

राहुरीत गुन्हा दाखल
डिग्रसला पतीपत्नीला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आमची गॅसची टाकी (Gas Tank) आत्ताच्या आत्ता आम्हाला द्या. असे म्हणत दोघा पतीपत्नीला लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण (Beating) करण्यात आली. ही घटना दि. 11 मे रोजी राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) गडदे आखाडा येथे घडली.

सौ. रोहिणी नितीन सोनवणे, वय 30 वर्षे, रा. डिग्रस ता. राहुरी यांनी राहुरी पोलिसात (Rahuri Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 11 मे रोजी पाच वाजे दरम्यान सौ. रोहिणी सोनवणे व तिचे पती नितीन सोनवणे हे त्यांच्या घरासमोर होते. तेव्हा तेथे प्रविण सोनवणे व पूजा सोनवणे हे दोन आरोपी आले. ते रोहिणी सोनवणे यांना म्हणाले, आमची गॅसची टाकी आत्ताच्या आत्ता आम्हाला द्या. असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण (Beating) केली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजे दरम्यान आरोपी राहुल बनसोडे व ॠतिक बनसोडे हे दोघे तेथे आले आणि सौ. रोहिणी सोनवणे व नितीन सोनवणे यांना म्हणाले, तुम्ही आमची बहीण पूजा हिचेसोबत भांडण करता काय? असे म्हणून त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण (Beating) केली.

घटनेनंतर रोहिणी नितीन सोनवणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिर- प्रविण वसंत सोनवणे, जावू- पूजा प्रविण सोनवणे, दोघे राहणार डिग्रस ता. राहुरी तसेच राहुल नानासाहेब बनसोडे, ॠतिक नानासाहेब बनसोडे दोघे राहणार आंबी, ता. राहुरी या चार जणांवर मारहाण (Beating) व धमकी (Threat) दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.