सोनई | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका टेलरिंग व्यावसायिकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून टेलर व कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने

अश्लील व्हिडिओ, इमेजेस व्हायरल केल्याच्या आरोपावरून देहरे तालुका नगर येथील एका महिलेविरुद्ध अहमदनगरचे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत टेलरिंग व्यावसायिकाने अहमदनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली की, १९ डिसेंबर २०२० रोजी मी फेसबुक पाहत असताना मला माझ्याच नावाचे फेसबुक अकाउंट दिसले. त्यावर अश्लील व्हिडिओ इमेजेस अपलोड केलेले दिसले व आमची बदनामी करत असल्याचे लक्षात आल्याने स्क्रीनशॉट काढून सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर सदर अकाऊंट त्यावेळी बंद झालेले होते. त्यानंतर २९/१२/२०२० रोजी मी परत फेसबुक पाहत असताना माझ्या नावाचे फेसबुक अकाउंट मला दिसले त्यावर अश्लील व्हिडिओ इत्यादी अपलोड केल्याचे दिसले मी व माझे कुटुंबाची पुन्हा बदनामी केली जात असल्याचे दिसल्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा भादवि कलम ५०० आय.टी.अॅक्ट ६६(सी),६७,६७(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.