श्रीरामपूरमध्ये हरिण आढळले मृतावस्थेत; बिबट्याने केली शिकार?

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीरामपूरमध्ये हरिण आढळले मृतावस्थेत; बिबट्याने केली शिकार?

श्रीरामपूर l प्रतिनिधी

शहरातील सूर्यानगर भागात आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास एक मादी जातीचे हरीण मृतावस्थेत आढळले. या हरणाची बिबट्याने शिकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

श्रीरामपूरमध्ये हरिण आढळले मृतावस्थेत; बिबट्याने केली शिकार?
बेपत्ता असलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह मुळा धरणाच्या पाण्यात आढळला

आज सकाळी हरीण मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली शहराला लागून शेती महामंडळाची टिळकनगर मळ्याची मोठ्या प्रमाणावर जमीन आहेत. या ठिकाणी अलीकडच्या काळात हरणांचा वावर सुरु होता. तसेच दुधाळ वस्ती, खंडागळे वस्ती, बेलापूर ते दिघी रोड व बेलापूर परिसरात बिबट्याचाही वावर आहे. त्यातच आज येथील लोकवस्तीत पहाटे मृतावस्थेत हरीण आढळले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पत्रकार बाळासाहेब भांड यांनी पालिका प्रशासन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच वन विभागाचे अधिकारी दुपारपर्यंत आले नव्हते. ते आल्यानंतरच हरिणावर हल्ला कोणी केला ? हे समजू शकेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com