गोदाकाठच्या अनेक गावामध्ये हरणांचा उच्छाद; कोवळी पिके करतायेत नष्ट

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
गोदाकाठच्या अनेक गावामध्ये हरणांचा उच्छाद; कोवळी पिके करतायेत नष्ट

मातुलठाण | वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण, नायगाव परिसरात हरणाच्या कळपाने उच्छाद मांडला आहे अगोदरच अार्थिक संकटात असणाऱा बळीराजा आता मोठ्या संकटात सापडला आहे.

सोयाबीन, कपाशी, कोवळी पिके या हरणााच्या कळपांनी भुईसपाट केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तरी या नष्ट केलेल्या पिकांचे वनविभागाने पाहणी करुन पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातुन होऊ लागली आहे.

गोदापट्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक-र्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन कपाशी, मका आदी पिकाची पेरणी केली. यावर्षी बियाणे खताच्या किमंती व मजुरी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले होते. बॅक कर्ज, उसनवारी करुन कशीबशी पेरणी केली होती. पिके जोमाने उतरल्याने शेतकरी समाधानी झाला होता. अतिशय कष्ट करुन उभे पिके जोमाने वाढत होती.

पण या कोवळ्या पिकावर मात्र परिसरात असलेल्या मोठ्या प्रमाणात हरणाच्या कळपाने एका दिवसात पिके खावुन नषट केली. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे. परिसरात अनेक कपाशी, सोयाबीन क्षेत्र या हरणाच्या कळपांनी नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर पाऊस असुनही टुबार पेरणीचे संकट आले आहे.

सतत रिमझिम पाऊस असल्याने शेतकरी आपल्या शेतात राखण करण्यासाठी जाऊ शकत नाही आणि या परिसरात हरीणासारखे वन्यप्राणी असल्यामुळे शेतक-यांनी संपुर्ण शेताला कंपाऊंड केले आहे; पण त्यासाठी मोठा खर्च येतो त्यामुळे लहान शेतकर्‍याना हे परवडत नाही अगोदरच कर्जबाजारी असलेला शेतकरी हवादिल झाला आहे. या महत्त्वाच्या प्रश्नांकडे वन विभागाने लक्ष घालावे अशी मागणी परिसरातून होऊ लागली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com