अंबिका महिला सहकारी पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

अंबिका महिला सहकारी पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सहकारी पतसंस्था चळवळीत अग्रगण्य असलेल्या अंबिका महिला सहकारी पतसंस्थेस नाशिक विभागातील महिला गटात 100 कोटी ठेवी असलेल्या प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा सन 2019-20 चा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने संस्थेस राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ.सुशिलाताई नवले, संचालिका सौ. रेखाताई घाटे, सौ. कुसुमताई जाधव, सौ. अनिता माळी सौ. लताताई धनवटे, सौ. कुसुमताई मोहन यांनी स्विकारला.

हा पुरस्कार पतसंस्था चळवळीत दिशादर्शक काम असणार्‍या पतसंस्थांना देण्यात येतो. त्यासाठी संस्थेची ठेव वृध्दी, कर्जवितरण, गुंतवणूक, भागभांडवल, स्वनिधी, नफा लेखापरिक्षण वर्ग, सामाजिक कार्य तसेच करोना काळात ग्राहकांना दिलेली सेवा विचारात घेऊन निवड समितीने संस्थेची पुरस्कारासाठी निवड केली.

सलग 5 व्या वर्षी पतसंस्थेला पुरस्कार मिळाला आहे. संचालक मंडळाचे पारदर्शक कामकाज, सेवक वर्गाची तत्पर सेवा, दैनिक ठेव प्रतिनिधींचे ठेव वृध्दीचे कामकाज इत्यादींच्या कामामुळे हा दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराने भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी चालना व प्रोत्साहन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्षा सौ.सुशिलाताई नवले यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com