देडगावात 5 जणांना काठीने मारहाण; चौघांवर गुन्हा

देडगावात 5 जणांना काठीने मारहाण; चौघांवर गुन्हा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून 5 जणांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत किरण संजय हिवाळे (वय 23) धंदा-शेती रा. बालाजी देडगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, रविवार 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून रात्री साडेदहाच्या सुमारास विजय शामवेल हिवाळे, राजू शामवेल हिवाळे, शामवेल दावीद हिवाळे व मारिया शामवेल हिवाळे सर्व रा. देडगाव ता. नेवासा यांनी मला व भाऊ विकास संजय हिवाळे, भावजयी सोनाली विकास हिवाळे, सासू सविता शिवाजी बनसोडे व आजोबा बाजीराव विश्राम हिवाळे असे आम्हाला काठीने व काहीतरी धारदार हत्याराने कानावर, हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरून विजय शामवेल हिवाळे, राजू शामवेल हिवाळे, शामवेल दावीद हिवाळे व मारिया शामवेल हिवाळे या चौघांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 971/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश गडाख करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com