घरपोच दारू पोहोचवण्याचा निर्णय मागे घ्या

दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते व साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांची मागणी
घरपोच दारू पोहोचवण्याचा निर्णय मागे घ्या

अकोले l प्रतिनिधी

ऑक्सिजन पोहोचला नाही तरी चालेल, रेमडेसीवीर पोहोचले नाही तरी चालेल पण दारू घरपोच पोहोचली पाहीजे. दारू व इतर व्यसनाने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने करोना काळात अंमली पदार्थावर अंकुश लावा पण इथे सरकार घरपोच दारू पाठवते आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते व साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तसेच, 'आज लॉकडाऊनमध्ये कामगार वर्ग घरी आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहेत. अशा वेळी हा नको असलेला अनावश्यक खर्च कुटुंबाचा तुम्ही का वाढवता? मागील वर्षी दारूची दुकाने सुरू केल्यावर महिलांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेण्याच्या घटना घडल्या होत्या. हे विचारात घेऊन किमान कुटुंबाची बचत कायम राहण्यासाठी तरी हा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची सरकारला विनंती आहे. बाहेर दारू पिणारे वडील घरात लहान मुलांसमोर दारू पित बसणार यात मुलांवर होणारा परिणाम सरकार विचारात घेणार आहे का...?' असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे.

Title Name
वाईन शॉप खुले होताच मद्यपींची झुंबड
घरपोच दारू पोहोचवण्याचा निर्णय मागे घ्या

'व्यसनाच्या बाबतीत दारू काही दिवस जर मिळाली नाही तर त्यातून व्यसन सुटण्याची शक्यता अट्टल दारुड्या नसलेल्याच्याबाबत वाढते. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी दारू न मिळाल्याने अनेकांनी व्यसनमुक्त होण्यास मदत झाल्याचे सांगितले पण सरकार लॉकडाऊन असतानाही जर दारू देणार असेल तर व्यसनमुक्तीची शक्यताच मावळते' असे त्यांनी म्हंटले आहे.

गरीब हातगाडीवाले छोटे विक्रेते हे उपाशी मरत असताना त्यांना करोनाच्या नावाखाली दुकाने बंद ठेवायला लावणार आणि दुसरीकडे श्रीमंत दारुवाल्यांना मात्र पैसे कमवायला परवानगी देणार हा भेदभाव संतापजनक आहे. महसुलाचे कारण ही गैरलागू आहे. आमदार निधी एक कोटीने वाढविणे, आमदारांचे पगार पुन्हा सुरू करणे व ४०० कोटीचे शिवसेना प्रमुखांचे स्मारक या प्रकारचे खर्च थांबवले तर सरकारला असे दात कोरून पोट भरावे लागणार नाही सल्लाही कुलकर्णी यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com