कर्जमाफी योजनेत राहाता तालुक्यात 334 पात्र

कर्जमाफी योजनेत राहाता तालुक्यात 334 पात्र
File Photo

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्यातील आघाडी सरकारने थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी दोन वर्षापूर्वी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. दोन लाखांपर्यंतच्या थकीत शेतकर्‍यांना यामध्ये कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रकीया अंतिम टप्प्यात असून नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत राहाता तालुक्यातील 334 शेतकर्‍यांचा कर्जमाफीसाठी समावेश आहे.तर शासकीय नोकरी व कर भरणार्‍या 895 शेतकर्‍यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील आघाडी सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये थकीत शेतकर्‍यांना कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन वर्षांनंतरही पहिल्या टप्प्यात दोन लाखांपर्यंतच्या थकीत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रकीया अद्याप सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या पात्र शेतकर्‍यांना आधार प्रमाणिकरणासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत आहे.राहाता तालुक्यात यामध्ये 334 शेतकरी पात्र आहेत. शासकीय नोकरी असणारे किंवा आयकर भरणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी अपात्र करण्यात आलेले आहे.

संगणकीकृत ऑनलाईन माहितीच्या आधारे तालुक्यातील अशा 895 शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती तालुका विकास अधिकारी श्री. गुळवे यांनी दिली आहे. जाहीर झालेल्या यादीमध्ये पिंपरी निर्मळ येथील पाच शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत तर 35 शेतकर्‍यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com