नगरमध्ये एसटी वाहकाचा मृत्यू

सहा दिवसांपासून सुरू होते उपोषण
नगरमध्ये एसटी वाहकाचा मृत्यू

अहमदनगर|Ahmedagar

पाच ते सहा दिवसांपासून घरीच उपोषणाला (Fasting Movement) बसलेल्या एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू (Death of ST Employee) झाल्याची घटना नगरमध्ये घडली. विजय महादेव राठोड (वय 46 रा. बुर्‍हाणनगर ता. नगर, मुळ रा. वांगुज ता. आष्टी जि. बीड) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे. राठोड (Rathod) हे कल्याण आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.

एसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण (Merger) करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर संप (State Strike) सुरू आहे. राठोडही या संपात (Strike) सहभागी झाले होते. त्यांनी नगर शहरातील तारकपूर (Tarkpur) येथील संपात सहभाग घेतला होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते उपाशी होते. रविवारी ते नगर जवळील मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

याबाबत त्यांच्या मुलाने सांगितले की, त्यांचा पगार सात हजार रूपये इतका झाला होता. दिवाळीचा बोनस ही अडीच हजार रूपये मिळाला होता. लॉकडाऊन काळात चार महिने केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही. सात हजार रूपयात घर खर्च कसा चालणार या चिंतेत ते होते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांनी जेवणही घेतले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाने केला आहे.

Related Stories

No stories found.