कारखाली कोंबडीचा मृत्यू झाल्याने चालकास धक्काबुक्की करुन गाडीचे नुकसान

कारखाली कोंबडीचा मृत्यू झाल्याने चालकास धक्काबुक्की करुन गाडीचे नुकसान

परस्परविरुद्ध फिर्याद दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर परिसरातील आठवाडी एकलहरे येथे कोंबडी मृत झाल्याने गाडी चालक गाडी बाहेर आला नाही म्हणून त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एकलहरे परिसरात आठवाडी परिसरात सॅन्ट्रो कार नं. एमएच 04 डिआर 508 या गाडीखाली कोंबडी चिरडून मेली. तेव्हा गाडी चालक सय्यद हा गाडीबाहेर आला नाही त्यावरुन तिघांनी सय्यद याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. कारच्या मागच्या बाजूला पत्र्यावर मारुन इंडिकेटरचे नुकसान केले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नवाब सय्यद (वय 36) रा. आठवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर यानी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1629/2021 प्रमाणे रविंद्र भानुदास बर्डे, सपना रविंद्र बर्डे, मंगल नाना बर्डे सर्व रा. आठवाडी, एकलहरे यांच्याविरुद्ध श्रीरामपूर भादंवि कलम 323, 504 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद रविंद्र भानुदास बर्डे यांनी दिल्यावरुन आरोपी नवाब सय्यद, रा. आठवाडी, एकलहरे याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा रजि. नं. 1630/2021 पमाणे भादवि कलम 504, 506 प्रमाणे दाखल करण्यात आला.

रविंद्र बर्डे या तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी सय्यद याच्या गाडीखाली कोंबडी मेली तेव्हा त्याच्याकडे विचारणा केली असता सय्यद याने वाईट वाईट शिवीगाळ करून धमकी दिली. 9 वा. हा प्रकार घडला. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लोटके हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com