ऑक्सिजन अभावी पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

नगर शहरातील 'या' हॉस्पिटलमधील प्रकार
ऑक्सिजन अभावी पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर|Ahmedagar

ऑक्सिजन अभावी पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना नगरमधील सावेडीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घडली.

मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी दौंड येथील प्रशिक्षण केंद्रातील आहे. हॉस्पिटलच्या हालगर्जीपणामुळे मूत्यू झाल्याचा आरोप मृत पोलिसाच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यास करोना संसर्ग झाल्याने 28 एप्रिलला नगर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुसर्‍या दिवशी त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडली. आज पहाटे पाच वाजता हाॅस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांना हाॅस्पिटलकडून सांगण्यात आले. आमच्याकडे ऑक्सिजन संपल्याने तुम्ही ऑक्सिजन घेऊन या, असे नातेवाईकांना सांगितल्याने नातेवाईक सिलेंडर घेऊन प्लॅटवर ऑक्सिजन आणल्यासाठी गेले. तेथे गेल्यावर कळाले की, संबंधीत हॉस्पिटलच्या नावाने त्या प्लॅटवर 13 सिलेंटर भरलेले होते. परंतू, हॉस्पिटलचा प्राधिकृत व्यक्ती ते आणायला गेले नाही. वेळेत ऑक्सिजन न मिळल्याने मृत्यू झाल्याने संबधीत हॉस्पिटलवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनास्थळी तोफखाना पोलीस दाखल झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com