जलतरण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

जामखेड | तालुका प्रतिनिधी

मेहकरी फाटारोड (Mehkari Fhata ROad) लगत असलेल्या जलतरण तलावात (swimming pool) पोहण्यासाठी गेलेल्या जामखेड (Jamkhed) येथील १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. आयान फयाज शेख असे मृत मुलाचे नाव आहे. यामुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

जलतरण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू
राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

कडा येथील द्वारका प्रतिष्ठानचे इंटरनॅशनल गुरुकुल असून त्यांचाच बीड-नगर महामार्गापासून जवळच मेहकरी फाटा रोडवर जलतरण तलाव आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोहण्यासाठी गर्दी असते.

सकाळी जामखेड येथील आयान हा नातेवाईकांसह अहमदनगर येथे हॉस्पिटला गेला होता.अहमदनगरवरून जामखेडकडे येताना तो पोहण्यासाठी थांबला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.

जलतरण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू
बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

दरम्यान, आठवड्यातील अशी दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी पाटोदा येथे एका मुलाचा जलतरण तलावात मृत्यू झाला होता. दोनच दिवसात परत कडा येथे दुसरा मृत्यू झाला आहे. यामुळे जलतरण तलावाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com