करोडीतील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या 'त्या' मुलीचा मृत्यू

आज पाझर तलावात आढळला मृतदेह
करोडीतील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या 'त्या' मुलीचा मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील करोडी (Karodi) येथील ओढयाला आलेल्या पुराच्या (Flood) पाण्यात वाहून गेलेल्या एका आठ वर्षाच्या आदिवासी मुलीचा (Tribal Girl) पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्यामुळे मृत्यू (Death) झाला. आज सकाळी करोडीच्या पाझर तलावात (Lake) तिचा तरंगलेला मृतदेह आढळुन आला.

करोडीतील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या 'त्या' मुलीचा मृत्यू
धक्कादायक ! बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिला ठार

मयुरी रावण भोसले (8, रा. करोडी, ता. पाथर्डी) असे या घटनेत मृत्यु (Death) झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार करोडी (Karodi) शिवारात डोंगर परिसरात भोसले कुटुंब रहातात.घराच्या शेजारी ओढा होता. सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोराचा पाऊस आल्याने अचानक ओढ्याला पुर (Flood) आला घराजवळ मयुरी ओढ्या नजीकअसताना आलेल्या पाण्यात (Water) वाहून गेली.

करोडीतील ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या 'त्या' मुलीचा मृत्यू
नगर जिल्ह्यावर शुक्रवारपर्यंत जोरदार पावसाचे संकट

तिचे वडील कामाला गेले होते तर आई शेळ्या चरण्यासाठी गेली होती. आल्यानंतर रात्रभर तिच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी मयुरीचा शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. मंगळवारी सकाळी नऊ वाजता करोडी गावच्या शिवारातील पाझर तलावात मयुरी हिचा मृतदेह तरंगल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे (Pathardi Police Station) पोलीस नाईक ईश्वर गर्जे,पो.कॉ.एकनाथ गर्कळ यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले.या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर गर्जे हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com