ह्रदयद्रावक! दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

ह्रदयद्रावक! दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

श्रीगोंदा | प्रतिनिधी

शेततळ्यात‌ (farm pond) पोहायला गेलेल्या दोन शाळकरी (school children) चिमुरड्यां मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि दुर्घटना श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील शेडगाव (Shedgoan) येथे घडली आहे. ही घटना शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मावळेवस्ती (Malewasti) ता. कर्जत (Karjat) येथील हरी नामदेव कोकरे (वय वर्षे १५) व विरेंद्र रामा हाके (वय वर्षे १६) हे शाळकरी मुले करोना (COrona) काळात शाळेला सुट्टी असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील शेडगाव (Shedgoan) येथील भवानी माता मंदिर (Bhavani Mata Temple) परिसरात गेले. मंदिर परिसरात पुणे (Pune) येथील चोपडा यांच्या शेतजमीनीत शेततळे आहे. दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले परंतु त्यांना शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला.

संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान फक्त शेळ्या घरी आल्याने कुटुंबीयांनी मुले घरी का आली नाहीत म्हणून शोधाशोध सुरू केली. घरच्यांनी शोध घेतला असता मुलांचे कपडे व चपला भवानी माता मंदीरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ दिसल्या. त्यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला त्याला बाहेर काढल्यावर तो मृत आढळला तर दुसऱ्याचा शोध घेताना अंधार पडल्याने अडथळा येत होता. परंतु पेडगाव येथील आसिफ शेख व समीर शेख या तरुणांनी पाण्यात उडी घेऊन रात्री नऊ-साडेनऊ वाजेच्या सुमारास दुसऱ्यालाही पाण्यातून बाहेर काढले. शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामूळे कर्जत-श्रीगोंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com