
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
उपचारादरम्यान मृत पावलेल्या रुग्ण महिलेल्या कानातील 15 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बाळ्या कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्या. ही घटना 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोलीस चौकातील एका बड्या हॉस्पिटल मध्येे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची पाराजी पोपट वाळके (वय 48, रा. उक्कलगाव, ता. श्रीगोंदा) यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले, फिर्यादी वाळके यांची आई भीमाबाई (वय 75) यांना औषधोपचारासाठी 22 रोजी नगर येथील पोलीस चौकातील एका बड्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 24 रोजी दुपारी चार वाजता भीमाबाई या मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यावेळी त्यांच्या कानात खुटबाळ्या व त्यावरील कुडके होते. त्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह शालीने गुंडाळून आणि साडी नेऊन आमच्याकडे सुपूर्द केला. गावी गेल्यानंतर पाहिल्यावर कानातील खुटबाळ्या अज्ञात इसमाने काढून घेतल्याचे दिसून आले. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.