ओझर खुर्द शिवारात आढळला मृत बिबट्या

ओझर खुर्द शिवारात आढळला मृत बिबट्या

आश्‍वी (वार्ताहर)

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील ओझर खुर्द (Ojhar Khurd) शिवारातील नेमबाई माळ परिसरातील शेतात गुरुवारी मृत बिबट्या (Leopard) आढळल्याने खळबळ उडाली असून या मृत बिबट्याला वनविभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, ओझर खुर्द (Ojhar Khurd) शिवारातील नेमबाई माळ परिसरात डाळीबं पिकाला औषध फवारणी करण्यासाठी चाललेल्या मंजूराना येथील शेतकरी शंकर आनंदा शिंदे यांच्या गट नंबर 73 मध्रे गुरुवारी सारंकाळी 4 वाजेच्या सुमारास एक बिबट्या निपचित पडलेला दिसला. त्यामुळे या मजूंराची भितीने गाळण झाली.

परंतू बराच वेळ होऊनही हालचाल होत नसल्याने धाडस करत थोडे जवळ पाहिले असता बिबट्या मृत असल्याचे लक्षात आले. शेतकरी शंकर शिंदे याना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान हा मृत बिबट्या हा अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा मादी बिबट्या असून दोन बिबट्याच्या भांडणात या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या मृत बिबट्यावर निबांळे येथील नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com