वेतन आयोगाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्यांची मागणी

डीसीपीएसधारक शिक्षक; शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन
वेतन आयोगाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्यांची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या डीसीपीएस, एनपीएसधारक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्याची मागणी डीसीपीएस धारक शिक्षकांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना वैभव सांगळे, सचिन कोटमे, सुशील नन्नवरे, कविराज बोटे, अरुण इघे यांनी दिले.

या प्रश्नाबाबत शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कडूस यांच्याशी चर्चा केली. शिक्षणाधिकारी यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वेतन पथक अधिक्षिका स्वाती हवेले यांच्याशी चर्चा घडवून आणली. पुढील महिन्यात ऑनलाईन दुसर्या हप्त्याची तरतूद केली जाईल व ज्या शाळेच्या 2019-20 च्या डीसीपीएसच्या राहिलेल्या पावत्या देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

डीसीपीएस धारक शिक्षकांच्यावतीने शिष्टमंडळाने डीसीपीएस धारकांना 2019-20 या वर्षीच्या पावत्या तात्काळ देण्यात याव्या, लवकरात लवकर दुसरा व तिसरा हप्ता देण्यात यावा, एनपीएसधारक शिक्षकांना एनपीएस किट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com