पुढील महिन्यात दुसर्‍या हप्त्याची तरतूद

डीसीपीएस धारक शिक्षकांना शिक्षणाधिकार्‍यांचे आश्वासन
पुढील महिन्यात दुसर्‍या हप्त्याची तरतूद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या डीसीपीएस/एनपीएस धारक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्याची मागणी डीसीपीएस धारक शिक्षकांच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना वैभव सांगळे, सचिन कोटमे, सुशील नन्नवरे, कविराज बोटे, अरूण इघे यांनी दिले.

सदर प्रश्नाबाबत शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कडूस यांच्याशी चर्चा केली. शिक्षणाधिकारी यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वेतन पथक अधिक्षिका स्वाती हवेले यांच्याशी चर्चा घडवून आणली. पुढील महिन्यात ऑनलाईन दुसर्‍या हप्त्याची तरतूद केली जाईल व ज्या शाळेच्या 2019-20 च्या डीसीपीएसच्या राहिलेल्या पावत्या देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com