
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सोलापूर रेल्वे विभागातील दौंड ते मनमाड रेल्वे स्थानका दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी 10 ते 25 जानेवारी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्या या रद्द तर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा देखील बदलल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरणाच्या कामासाठी कोपरगाव-कान्हेगाव सेक्शन दरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. 10 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दौंड-निजामाबाद डेमु तसेच 12 ते 19 जानेवारी दरम्यान दौंड-भुसावळ-दौंड डेमु रद्द करण्यात आली आहे. 21 आणि 23 जानेवारी व 23 ते 25 दरम्यान कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे.