डाऊच बुद्रुकमध्ये पांढरे सोने चोरीला

डाऊच बुद्रुकमध्ये पांढरे सोने चोरीला

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक परिसरात रात्रीतून शेतकर्‍यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशीवर भुरटे चोर डल्ला मारत असल्यामुळे शेतकऱी हवालदील झाले आहेत. या भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.डाऊच बुद्रुक येथील भिवराव मार्तंड दहे यांच्या शेतातील कपाशीच्या बोंडांमधून निघालेला कापूस रात्री भुरट्या चोरांनी वेचणी करत आपल्या सोबत घेऊन गेले.

तर गणपत संपत दहे यांच्या शेतातीलही उभ्या कपाशीवर असलेला कापूस ह्या चोरट्यांनी लंपास केला. रात्री दोन तीन तासांमध्ये साधारण एक माणूस 30 ते 40 किलो कापूस गोळा करू शकतो. मात्र ही चोरी करताना साधारण दहा ते पंधरा चोर असल्याचे सांगण्यात येते. एकाच रात्रीत हे चोरटे साधारण तीन ते चार क्विंटलपर्यंत कापूस चोरून नेतात.

यामुळे शेतकर्‍यांचे रातोरात तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कापसाबरोबरच या परिसरातून सोंगलेल्या सोयाबीनचे कडपे देखील चोरीला गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com