श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्या चांदेगाव ग्रामपंचायतीत चंद्रेश्वर महाविकास आघाडीचे दत्तात्रय नागेश खर्डे

यांची सरपंचपदी तर सौ. वैशाली पुजाराम माळवदे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.

चांदेगाव ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक सौ. मनिषा तोडमल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सरपंचपदासाठी दत्तात्रय नागेश खर्डे यांचा तसेच उपसरपंच पदासाठी सौ. वैशाली पुंजाराम माळवदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चांदेगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चंद्रेश्वर महाविकास आघाडीला सहा तर चंद्रेश्वर तरुण मित्रमंडळाचे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. मधुकर भागवत शिंदे, बाळासाहेब बर्डे, सौ. सुनिता सुरेश कोतकर, सौ. सुनिता नामदेव, सौ प्रमिला बाबासाहेब भांड, सौ. जया किशोर गायकवाड, नवनाथ गणपत वारघडे उपस्थित होते.

या निवडीच्यावेळी चंद्रेश्वर महाविकास आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग नारायण भांड, अशोक माळवदे, बाळासाहेब खर्डे, नानासाहेब शिंदे, दत्तात्रय माळवदे, बबन मुक्ताराम भांड, भगवान गायकवाड, मंजाबापू भोसले, सुनील कोतकर, विलास कोतकर, दत्तात्रय कोतकर, माणिकराव माळवदे, नामदेव माळवदे, आदिनाथ खर्डे, अनिल खर्डे, सचिन खर्डे, सुनिल माळवदे, नामदेव, भिमाशंकर शिंदे, गोकुळ शिंदे, श्रीनिवास शिंदे, महेश मुंगर्से, रमेश भांड, चंद्रकांत भांड, रामचंद्र भांड, गोरख भांड, संतोष वाघे, सुभाष सिनारे, राजेंद भोसले, अरुण भांड, सुभाष भांड, सागर भांड, रमेश भोसले, सुभाष भोसले, सुधाकर भोसले, दयाराव भोसले, किरण भोसले, शिवाजी गांगुर्डे, शिवाजी गायकवाड, नाना गायकवाड, उत्तमराव काळे, रमेश अरगडे, बाळासाहेब कणसे, गोतुसे बाळासाहेब, गोपाल नालकर, पोपट घाडगे, कोते बाळासाहेब, कोठुळे बाळासाहेब, यांचेसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस पाटील संतोष नागेश खर्डे यांनी सहकार्य केले.