दत्तनगर भागात दगडफेक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दत्तनगर भागात दगडफेक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव (Kopargav) शहरातील उपनगर असलेल्या दत्तनगर (dattnagar) भागात आपसात वाद होऊन शिवीगाळ व मोठं मोठ्याने आरडाओरडा होऊन दगड फेक (Stone throwing) झाली. याप्रकरणी सात जनांविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील उपनगर असलेले व अत्यंत गजबजलेले दत्तनगर या ठिकाणी काही नागरिक आपआपसात मोठं मोठ्याने आरडाओरड व शिवीगाळ करून दगड फेक करत असल्याची माहिती पोलिसांना (police) कळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले (PI Vasudev Desale) आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले.

तरी देखील पोलिसांसमोर आरडाओरडा, शिवीगाळ दगड फेक सुरूच होती, वातावरण अजून तापत असल्याचे व सार्वजनिक शांतता भंग होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी खाकी हिसका दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणून सदर प्रकरणी तेथे उपस्थित असणार्‍या पैकी आरोपी आनंद सखाराम माकोणे कृष्णा आमले, उमर फारुख शेख, कृष्णा संजय कापसे, प्रतिक लकारे, बंटी मनसुरी, रियाज शेख, सर्व रा. दत्तनगर, कोपरगाव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे यांच्या फिर्यादीवरून भा दं वि कलम 203/2021 कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com