दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी सुरु

दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी सुरु

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या दत्तनगर येथे येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोडी घडत असून दत्तनगर परिवर्तन आघाडीच्या विद्यमान सदस्या श्रीमती सोनाबाई लोंढे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर प्रवेश सोहळा संपन्न झाला. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मतदारांचे नाव नोंदणीचा कार्यक्रम दत्तनगर येथे होणार आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती लक्ष्मीबाई कांबळे म्हणाल्या की, आत्तापर्यंत आपण इतर पक्षांची कामे केली तरी आपल्या गावची प्रगती झालेली नाही.

यावेळी श्रीमती त्रिभुवन, श्रीमती गायकवाड, श्रीमती शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बबलू पवार, शाखाध्यक्ष नयन क्षीरसागर, शाखा उपाध्यक्ष सनी त्रिभुवन, उपाध्यक्ष मिलिंदराव जगताप, संपर्कप्रमुख अरुणराव खरात, संघटक भास्कर माघाडे, सल्लागार अशोकराव शिंदे, सल्लागार रामदास त्रिभुवन, मायकलराव भालेराव, अनिलराव उबाळे, सल्लागार राजू नरोडे, सांडू जाधव, लखन साळवे, पवन पवार, अरुण त्रिभुवन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार नागेश क्षीरसागर यांनी मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com