राहुरीच्या दातीर हत्याप्रकरणातील कान्हू मोरेला दहा दिवसांची पोलीस कोठडी

राहुरीच्या दातीर हत्याप्रकरणातील कान्हू मोरेला दहा दिवसांची पोलीस कोठडी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील आरटीआय कार्यकर्ते व पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे यास

रविवारी रात्री नेवासा परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, चार आरोपींपैकी या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली असून एक आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दातीर यांच्या खूनप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनला 286/2021 भादंवि. कलम 363, 341 वाढीव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी (वय 25 वर्ष, रा. जुने बस स्टँडजवळ, एकलव्य वसाहत राहुरी) व तोफिक मुक्तार शेख( वय 21 वर्ष, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

कान्हू गंगाराम मोरे ( वय 46 , रा.वांबोरी) यास नेवासा येथे नगर-औरंगाबाद जाणार्‍या रोडवरील एका हॉटेलमधून डिवायसीपी संदीप मिटके व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. काल सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com