दातीर हत्याकांडातील आरोपी कान्हू मोरे रूग्णालयातून पसार

दातीर हत्याकांडातील आरोपी कान्हू मोरे रूग्णालयातून पसार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

खुनाच्या गुन्ह्यात अटकेत (Arrested for murder) असलेला आरोपी कान्हू गंगाराम मोरे (Accused Kanhu Gangaram More) (वय 42 ) हा नगर येथील शासकीय रुग्णालयात आजारावर उपचार घेत असताना पोलिसांच्या (Police) तावडीतून पसार झाला.

करोना बाधित (Covid 19 Positive Patient) झाल्याने त्यास राहुरी तुरूंगातून (Rahuri Jail) उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. मोरे यास मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी घेवून जाण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र या वेळेतच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून मोरे हा पसार झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यासह बाहेरील रूग्णालये आली आहेत. मोरे हा राहुरीतील (Rahuri) पत्रकार रोहिदास दातीर (Journalist Rohidas Datir) यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी आहे. दातीर यांचा खून (Murder) केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे चारही आरोपी राहुरी (Rahuri) येथील तुरूंगात होते. तेथे मोरे यास करोनाने गाठल्यानंतर त्याला नगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेही त्याला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने मोरे यास पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. यातच तो पसार झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com