ना. तनपुरेंनी केले दातीर कुटुंबियांचे सांत्वन

ना. तनपुरेंनी केले दातीर कुटुंबियांचे सांत्वन

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

पत्रकार कै.रोहिदास दातीर यांच्या हत्येचा तपास पारदर्शक आणि कोणाच्याही दबावात होणार नाही.

एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाची निर्घृण हत्या होणे आणि गुन्हेगारांना साथ देणे म्हणजे मानवतेला काळीमा फासण्यासारखे आहे.त्यामुळे तनपुरे कुटुंब कधीच अशा गोष्टीला समर्थन करणार नाही. आम्ही वैयक्तिक लक्ष घालून दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि दुःखांकीत कुटुंबाला न्याय व कै.दातीर यांना श्रद्धांजली ठरेल. अशी भावनिक प्रतिक्रिया ना.प्राजक्त तनपुरे यांनी मयत दातीर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले असता दिली.

ना. तनपुरे हे मुंबईला असल्याने त्यांना दातीर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी दोन-चार दिवस जाता आले नाही. याचेच भांडवल करून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तनपुरे कुटुंबाला या खुनाच्या गुन्ह्यात बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आपण असल्या गुन्हेगार वृत्तीला खतपाणी घालणार नाही, याची खात्री आहे.

परंतु दातीर कुटुंबाला न्याय देणे, दहशतीखाली जगणार्‍या कुटुंबाचे मनोबल वाढवून न्यायासाठी शाश्वत करणे, गुन्हेगार कितीही मोठे असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अशा तीव्र भावना उपस्थित धनगर समाजातील नेत्यांनी ना. तनपुरे यांच्यापुढे मांडल्या. यावेळी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर, दत्ताभाऊ खेडेकर, दादाभाऊ तमनर, भारत मतकर, श्रीकांत बाचकर, संतोष बोरुडे, कुरणवाडीचे सरपंच आदी समाज बांधव उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com