
पारनेर |प्रतिनिधी| Parner
दसर्यासाठी पारनेर तसेच सर्व शहरांतील बाजारात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या फुलांना चांगला बाजार मिळण्याची शेतकर्यांची अपेक्षा आहे.
तालुक्यावर असलेल्या दुष्काळी सावटानंतर काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी खरीप हंगाम वाया गेला आहे. कमी पाण्यात येणारे उत्पन्न म्हणून तालुक्यातील शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. यामध्ये प्रामुख्याने आष्टर, बिजली, झेंडू या फुलांचे उत्पादन अधिक असते.
गणेशोत्सवात पाहिजे असे बाजार मिळाले नाहीत. परंतु नवरात्रात काही प्रामाणात बाजार बरे होते. तर शेवटचा दिवस असलेल्या दसरा सणात झेंडू फुलांचे महत्त्व असल्याने आदल्या दिवशी संपूर्ण बाजारात झेंडूंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे चित्र आहे. आता चांगल्या बाजाराची शेतकर्यांना अशा लागून राहिली आहे.