नगरचे ग्रामदैवत ‘श्री विशाल’चे दर्शन, आरती ऑनलाईन
सार्वमत

नगरचे ग्रामदैवत ‘श्री विशाल’चे दर्शन, आरती ऑनलाईन

उद्या श्रींची प्रतिष्ठापना: यंदा फक्त गणेशयाग

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचे दर्शन यंदा ऑनलाईन पध्दतीने नगरकरांना घडविले जाणार आहे. उद्या शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी दिली.

गणेशोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या आतील बाजु आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीव देवस्थान आयोजित करत असलेले सर्व सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहे. शेवटचे तीन दिवस गणेश यागाचा धार्मिक कार्यक्रम मात्र होणार आहे. श्री गणपती देवस्थान नावाने फेसबुक आणि यु ट्युबवर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ऑनलाईन दर्शनाची सुविधा गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती अ‍ॅड आगरकर यांनी दिली. ढोल, ताशासह निघणारी विर्सजन मिरवणूक यंदा निघणार नाही. अत्यंत साध्या पध्दतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

एसपी अखिलेशकुमार सिंह व सौ सिंह यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देवस्थान समितीचे विश्वस्त यावेळी उपस्थित असतील. भक्तांना मात्र प्रवेश दिला जाणार नाही. भक्तांसाठी प्रतिष्ठापना विधी लाईव्ह पाहता येणार आहे.

श्री गणेशाची आरतीमध्ये भाविकांना सकाळ व संध्याकाळ सहभागी होता येणार आहे. यंदा आरतीचे लाईव्ह फेसबूक आणि यु ट्युबवर पाहता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com