कोपरगावकरांना मिळणार दारणातून 3.32 दलघमी वाढीव पाणी

कोपरगावकरांना मिळणार दारणातून 3.32 दलघमी वाढीव पाणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाढणारी लोकसंख्या विचारात घेता काही अटींवर दारणा धरणातून गोदावरी डावा कालव्यातून कोपरगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी 3.32 दलघमी वाढीव पाण्याचा हक्क मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जलसंपदा विभागाने काल जारी केले आहे. या निर्णयामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून दारणा धरणातून गोदावरी डाव्या कालव्यातून कोपरगाव नगर परिषदेसाठी पिण्यासाठी 3.32 दलघमी वाढीव मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. 17 नोव्हेंबर 2016 नुसार सिंचन प्रकल्पातून विविध प्रवर्गासाठी क्षेत्रिय वाटप निर्धारित करणे व बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या योजनेसाठी सन 2052 ची लोकसंख्या विचारात घेऊन 3.32 दलघमी वाढीव पाणी आरक्षणास मंजुरी देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार हे वाढीव पाणी काही अटींवर मंजुर करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com