दारणा, गंगापूरच्या साठ्यात होतेय वाढ

दारणा, गंगापूरच्या साठ्यात होतेय वाढ
दारणा (File Photo)

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल दिवसभरात गंगापूर (Gangapur) दारणाच्या पाणलोटात (watershed of Darna) मध्यम पावसाने हजेरी लावली. गंगापूर धरणात (Gangapur Dam) दिवभरात 76 दलघफू नविन पाणी दाखल झाले. यामुळे या धरणात काल सायंकाळी 5 वाजता 87.21 टक्के पाणी साठा झाला होता. तर दारणाचा साठा (Darna Water Storage) काल सकाळी 6 वाजता 84.67 टक्के इतका होता हा साठा सायंकाळ पर्यंत 86 टक्क्यांहुन अधिक झालेला असेल.

दारणात (Darna) काल सकाळी 6 वाजेपर्यंत मागील 24 तासात 132 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणात (Darna) 6 टिएमसी पाण्याचासाठा झाला आहे. तर गंगापूर (Gangapur) मध्ये 5 टिएमसीच्या जवळपास साठा तयार झाला आहे. काल सायंकाळी आळंदी धरणही ओव्हरफ्लो झाले. या धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु झाला आहे. या आळंदी या लघु प्रकल्पात 816 दलघफू पाणी साठा आहे. दारणातुन 150 क्युसेक, भावलीतुन दारणात 135 क्युसेक, वालदेवीतुन गोदावरीकडे (Godavari) 65 क्युसेक, तर गोदावरीत नदीत (Godavari River) नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात 1211 क्युसेक ने विसर्ग स्थिर आहे. पालखेडचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. पालखेड धरणात 75.19 टक्के पाणी साठा आहे.

काल दिवसभरात गंगापूरच्या (Gangapur) मिळालेल्या आकडेवारी नुसार गंगापूर च्या भिंतीजवळ 30 मिमी, कश्यपी ला 21 मिमी, गौतमी ला 8 मिमी, त्र्यंबकला 10मिमी, तर आंबोलीला 16 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरचासाठा काल सायंकाळी 5 वाजता 87.21 टक्के, काश्यपी 59.82 टक्के, गौतमी चा 70.60 टक्के असे साठे झाले आहेत.

दारणा काल सकाळी 6 वाजता 84.67 टक्के इतके होते. मुकणे 57.67 टक्के, कडवा 85.90 टक्के, असा पाणी साठा होता. भावली, भाम , वालेदेवी, आळंदी हे धरणं 100 टक्के भरली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com